बिहारच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पश्चिम बंगालकडे कूच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021
Total Views |
devendra fadanvis_1 



मुंबई -
बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालकडे कूच केली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज फडणवीस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.
 
 
 
पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण बरेच तापले आहे. तृणमुल काॅंग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये थेट लढत आहेत. अशा परिस्थितीत प्रचाराच्या या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस उतरले आहेत. बिहारनंतर आता फडणवीस प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. आज आणि उद्या असे २ दिवस भाजपच्या प्रचारासाठी ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. यावेळी विमानतळावर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
 
 
 
बजबज आणि महेशताला अशा २ मतदारसंघांमध्ये फडणवीसांच्या सभा आणि यात्रा होणार आहेत. फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी यापूर्वी सोपवण्यात आली होती. एखाद्या राज्यात निवडणुक असल्यास इतर राज्यातील पक्षाच्या नेत्यांना त्या राज्यात प्रचाराला पाठवण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. राज्यातील पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्यावर पश्चिम बंगालच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपने सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये लावलेली दिसत आहे. म्हणूनच फडणवीस यांच्यासह देशभरातील भाजपचे प्रमुख नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात प्रचार करताना दिसणार आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@