कसोटी सामन्यासाठी गुलाबी चेंडूचा प्रयोग का? : वाचा सविस्तर

    दिनांक  22-Feb-2021 20:02:57
|
Ball_1  H x W:
 


मुंबई : भारत-इंग्लंड क्रिकेट संघात २४ फेब्रुवारीला अहमदाबादच्या मोटेरा स्टेडीअममध्ये तिसरा कसोटी सामना 'दिवस-रात्र' खेळवला जाणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी १-१ सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा आहे.
 
 
 
गेल्या सहा वर्षांतील १६वा आणि भारतीय मैदानावरील दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. मग लाल किंवा सफेद चेंडूचा वापर दिवस-रात्र कसोटी सामना का खेळला जात नाही आणि क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात तीन रंगांच्या चेंडूची गरज का आहे? हे आपण जाणून घेऊयात...
 
 
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चेंडू नजरेला दिसणे आवश्यक आहे. खेळताना वापरला जाणारा चेंडू वेगाने आला तर तो लागून इजा होण्याची शक्यता जास्त असते. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये आजवर या प्रकारामुळे अनेकांना प्राण सुध्दा गमवावे लागले. सर्व गोष्टींचे निरिक्षण करून क्रिकेट प्रशासनाने हा निर्णय घेतला.
 
 
चेंडूचा रंग असा असावा की तो खेळाडूला चांगल्या प्रकारे दिसू शकतो. जेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाला सुरूवात झाली तेव्हा क्रिकेट लाल चेंडूने खेळला जात होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात सुरूवातीला लाल रंगाच्या चेंडूने खेळले जात होते. पहिले चार विश्वचषक (1975,1979,1983,आणि 1987) लाल चेंडूने खेळवण्यात आले होते. दिवस-रात्र सामन्यात सफेद चेंडूचा प्रयोग केला जाऊ लागला. दिवस-रात्र कसोटी सामन्यात खेळवले गेले. त्यामुळे गुलाबी चेंडुचा वापर करण्यास सुरुवात झाली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.