"अधिवेशनामुळे कोरोनाची भीती दाखवली जात आहे"

22 Feb 2021 22:14:29

deshpande_1  H

मनसे नेते देशपांडे यांचा सरकारवर आरोप


मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत, त्यामुळे सरकार लॉकडाउन तसेच येणार अधिवेशन ही कमी वेळात घेण्याचा विचार करत आहेत. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्याच मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी अधिवेशन आलं, म्हणून कोरोनाचा नवीन स्ट्रेन दाखवत भीती दाखवली जात आहे असा आरोप सरकारवर करत ,टीका केली आहे.
“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.यानंतर मला ट्रोल केलं जाईल असे देखील ते म्हणाले.
तसेच पुढे देशपांडे म्हणाले की, “अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा गंभीर आरोपही देशपांडेंनी केला.
Powered By Sangraha 9.0