मराठी इन्स्टाग्राम स्टार समीर गायकवाडची आत्महत्या

    दिनांक  22-Feb-2021 14:42:37
|

Samir Gaikwad_1 &nbs
पुणे : मराठीतील टिक-टॉक स्टार आणि इन्स्टाग्रामवर रील व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या समीर गायकवाडने राहत्या घरी आत्महत्या केली. रविवारी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
२२ वर्षीय समीरने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील वाडिया महाविद्यालयामध्ये समीर गायकवाड शिक्षण घेत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारा समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये प्रसिद्ध होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता. मात्र, समीरने उचललेल्या पाऊलामुळे त्याच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.