मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021
Total Views |

Chhagan Bhujbal_1 &n
नाशिक : राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती माध्यमांना दिली. तसेच, मंत्री भुजबळ कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह अन्य मंत्र्यांच्या संपर्कात आले होते. तसेच, एका लग्न समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत पालकमंत्री छगन भुजबळदेखील उपस्थिती होते.
 
 
 
 
 
 
 
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत ठीक असून मागील दोन-तीन दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी" असे त्यांनी ट्विट केले आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. भुजबळ सध्या नाशिकच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी क्वांरटाइन आहेत. देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. तसेच भुजबळ हे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून त्यांनी रविवारीच बैठक देखील घेतली होती. तसेच कोरोना संदर्भात अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक देखील त्यांनी घेतली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@