अनंतनागच्या जंगलातील अतिरेक्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

22 Feb 2021 13:00:40

anantanag_1  H


'एके-४६’ रायफल, दोन चिनी पिस्तुले, दोन चिनी ग्रेनेडचा देखील समावेश

श्रीनगर: भारताचे नंदनवन असणार्‍या काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा उच्छाद कायम असल्याचे चित्र आहे. श्रीनगरमधील कृष्णा ढाब्यावर झालेल्या हल्ल्यातील म्होरक्याला अटक केल्यानंतर भारतीय सुरक्षादलाने रविवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी अनंतनागच्या जंगलातील दहशतवादी ठिकाणांचा खुलासा केला.
 
 
सुरक्षादलाने अनंतनागच्या जंगलतून तीन ‘एके-४६’ रायफल, दोन चिनी पिस्तुले, दोन चिनी ग्रेनेड, एक दुर्बीण आणि सहा ‘मॅगजिन’सह घातापातासाठी आवश्यक असणारा मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
 
 
अनंतनागच्या जंगलामध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. भारतीय जवानांची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. मात्र, शस्त्रसाठा त्यांना स्थलांतरित करता आला नाही. अतिरेक्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Powered By Sangraha 9.0