पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारांचा ३० रुपयांपर्यंत व्हॅट!

20 Feb 2021 19:00:50

fuel _1  H x W:
 
 


मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर थांबण्याचे नाव घेत नाहीत. आज सतत १२ व्या दिवसात इंधनदरवाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल ९०.५९ रुपये, मुंबईत ९७ रुपये प्रतिलीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत शनिवारी ३९ पैसे आणि डिझेल ३७ पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचे दर ९६.३२ रुपये तर डिझेल ८७.३२ रुपयांवर पोहोचले. आता इंधनदरवाढीमुळे राजकीय वादात तेल ओतले जात आहे. राज्य सरकारतर्फे यासाठी केंद्राला जबाबदार धरण्यात येत असले तरीही इंधनदरवाढीत राज्य सरकारही जबाबदार आहे. मात्र, याबद्दल राज्यातील नेतेमंडळी चिडीचूप आहेत. महाविकास आघाडी सरकारतर्फे विजबिल दरवाढही मागे घेण्यात आलेली नाही.
 
 
 
ही आहेत दरवाढीची प्रमुख कारणे
 
कच्चे तेल १३ महिन्यांपासून महागाईच्या स्तरावर आहे. यंदाच्या वर्षी तेल २३ टक्क्यांनी वधारले होते. १ जानेवारी रोजी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ५१ डॉलर प्रति बॅरल इतके होते. सध्याच्या घडीला हे दर ६३ डॉलर इतके झाले आहे. यामुळे लॉकडाऊननंतर आर्थिक व्यवहार जगभरात सुरळीत सुरू झाल्याचा एक संदेश आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर घटवत नसल्याने हा बोजा वाढत चालला आहे. दिल्लीचे उदाहरण घेतल्यास एक लीटर पेट्रोलवर ३२.९० रुपये डिझेलवर ३१.८० रुपये अबकारी कर लावण्यात येतो. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारत आहेतत. दिल्लीत हा व्हॅट
 ३०.६१ रुपये इतका आहे.
 
 
१ वर्षात कच्चे तेल ८.४७ टक्क्यांनी वधारले
 
गेल्या वर्षात २० फेब्रुवारी २०२० रोजी कच्च्या तेलाचे दर हे ५९ डॉलर प्रतिबॅरल होती. ती थेट वर्षभरानंतर ६४ डॉलरवर पोहोचली आहे. वर्षात हा दर ८.४७ टक्क्यांनी वाढली आहे. जर पेट्रोलचा विचार केला तर ते २५ टक्क्यांनी महागले आहे. फेब्रुवारी २०२० रोजी ७२ रुपये प्रतिलीटर होते आता हे दर शंभरी गाठत आहेत. मे २०२० मध्ये सरकारतर्फे पेट्रोलवर १० तर डिझेलवर १३ रुपये एक्साईज ड्युटी वाढली आहे.


Powered By Sangraha 9.0