दिशा रवीला ३ दिवस न्यायालयीन कोठडी

20 Feb 2021 12:53:29

disha ravi_1  H


पोलिसांच्या चौकशीदरम्यान ती सहकार्य करीत नसल्याचे उघड


नवी दिल्ली: ‘टूलकिट’ प्रकरणातील आरोपी दिशा रवी हिची दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, दिशा चौकशीस सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
 
 
 
देशात अराजकता पसरविण्याची योजना आखणार्‍या आणि त्यासाठी ‘टूलकिट’ संपादित करण्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी दिशा रवी हिला दि. १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथून अटक केली होती. त्यानंतर तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ‘पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ या खलिस्तानवादी समूहाशी घनिष्ठ संबंध असल्याचा आणि त्यांच्या सांगण्यावरून देशात अराजकता पसरविण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
 
 
 
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आता तिची रवानगी तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, दिशा रवी चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सुनावणीदरम्यान सांगितले. त्याचप्रमाणे याप्रकरणातील सहआरोपी शंतनू आणि दिशा यांची समोरासमोर बसवून चौकशी करणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली.




Powered By Sangraha 9.0