‘मेट्रोमॅन’ होणार आता ‘भाजपवासी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2021
Total Views |

metroman_1  H x



केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांची माहिती


तिरुवनंतपुरम: ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ई-श्रीधरन आता लवकरच ‘भाजपवासी’ होणार आहेत. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी गुरुवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
 
 
 
सुरेंद्रन यांनी सांगितले की, “श्रीधरन यांनी भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. येत्या काही दिवसांत विजययात्रा मलप्पुरममध्ये दाखल झाल्यानंतर ते पक्षात सामील होतील. श्रीधरन यांनी विधानसभा निवडणूक लढावी, ही आमची इच्छा आहे. आम्ही त्यांना तसा प्रस्ताव दिला आहे.
 
 
 
परंतु, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळाले नाही,” असे त्यांनी सांगितले. 88 वर्षीय श्रीधरन हे देशात सर्वत्र ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जातात. ते १९९५ ते २०१२ पर्यंत दिल्ली मेट्रोचे संचालक होते. केंद्र सरकारने त्यांना २००१ मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००८ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.



@@AUTHORINFO_V1@@