खुशखबर! आता सर्वसामांन्यांनाही लस मिळणार ?

18 Feb 2021 15:00:51
covid_1  H x W:



३० कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट




नवी दिल्ली:
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे. सरकारनं यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. ही लस फक्त सरकारच देतं आहे, म्हणजे तुम्हाला जर वैयक्तिकरित्या ही लस घ्यायची असेल तर ती तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध नव्हती.
 
 
 
 
 
मात्र आता लवकरच ही लस सर्वांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. आणि हे उत्तर दिलंय, नवी दिल्लीतील एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी. या वर्षातच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. "प्राधान्यानं ज्यांना लस दिली जाते आहे, त्यांचं लसीकरण झाल्यानंतर आणि लशीच्या मागणीइतकाच पुरवठा होत असेल तेव्हा कोरोना लस बाजारात उलब्ध करून दिली जाईल. कदाचित याच वर्षाच्या शेवटी किंवा त्याआधीच हे शक्य होईल अशी आशा आहे." असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
जूनपर्यंत ३० कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांनादेखील लस दिली जाण्याची शक्यता आहे.



Powered By Sangraha 9.0