मॉरीसने टाकले युवराजला मागे ; १६.२५ कोटींची बोली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2021
Total Views |

Chris_1  H x W:
 
 
 
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या आजवरच्या इतिहासात दाखीन आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरीसवर राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक १६.२५ कोटींची बोली लावली. आत्तापर्यंत भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगवर १६ कोटींच्या बोलीचा इतिहास होता. आता मात्र तो मॉरीसच्या नावावर गेला आहे. २०१५च्या आयपीएल लिलावामध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्सने युवराजवर १६ कोटींची बोली लावली होती. यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर हा रेकॉर्ड तुटला.
 
 
 
 
 
 
 
 
 
पहिल्या टप्प्यापर्यंत आयपीएल २०२१च्या लिलावात मोईन अलीवर ७ कोटींची बोली लागली असून त्याचा समावेश चेन्नई सुपर किंग्समध्ये करून घेण्यात आला आहे. शकीब अल हसनचा पुन्हा कोलकत्तामध्ये समावेश करून घेण्यात आला आहे. ग्लेन मॅक्सवेलला १४.२५ कोटींना बंगळुरूने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. २ कोटी २० लाखांच्या किमतीला स्टीव्ह स्मिथ दिल्लीच्या संघात दाखल करून घेतले. करूण नायर अलेक्स हेल्स जेसन रॉय अरोन फिंच, हनुमा विहारी आणि केदार जाधव हे खेळाडू अनसोल्ड राहिले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@