अखेर अर्जुन तेंडूलकर मुंबई इंडियन्समध्ये

    दिनांक  18-Feb-2021 21:14:26
|

Arjun Tendulkar_1 &n
 
 
मुंबई : आयपीएलचा लिलाव आणि सचिनचा मुलगा अर्जुन तेंडूलकर कोणत्या संघाकडून खेळणार? हा मोठा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. अखेर गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुनला २० लाखांमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. अर्जुनची बेस प्राइज ही २० लाख रुपये एवढी होती. यावेळी अर्जुनला संघात घेण्यासाठी कोणताही संघ उत्सुक असल्याचे दिसत नव्हते. त्यावेळी मुंबईच्याच संघाने अर्जुनला त्याच्या बेस प्राइजलाच आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. आता तो मैदानात कधी उतरणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.