जुन्या ‘लालपरी’त नैसर्गिक इंधनाचा वापर

17 Feb 2021 13:24:04

st bus_1  H x W

तीन हजार बसेसमध्ये ‘एलएनजी’ इंधन यंत्रणा

नाशिक: राज्य परिवहन मंडळाच्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या बसमध्ये इंधन प्रकार बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन हजार बसेसमध्ये ‘एलएनजी’ (द्रव नैसर्गिक वायू) इंधन यंत्रणा बसवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० बसेसमध्ये ही सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार पुढे येतात का, हे तपासले जात आहे. केवळ ‘एलएनजी’ नव्हे, तर ‘सीएनजी’ इंधन म्हणून वापरण्यावरही भर असून केंद्र सरकारकडून राज्यासाठी १५० इलेक्ट्रिकल बसेसही उपलब्ध झाल्या आहेत. सध्या महामंडळाला खासगी आरामदायी बसची आवश्यकता आहे. ‘शिवशाही’च्या कंत्राटदाराने पूर्वी ५५० बसेसचे कंत्राट घेतले होते.
 
 
 
 
कोणत्याही भांडवली गुंतवणुकीशिवाय व चालकाच्या खर्चाविना सुरू असणार्‍या या बसच्या व्यवहारातून कंत्राटदाराने काही बस काढून घेतल्या आहेत. त्यामुळे नव्या खासगी बसची राज्य परिवहन मंडळाला गरज आहे. येत्या काळात मालवाहतुकीमध्येही महामंडळ उतरणार असून जुन्या बसेस यासाठी वापरण्यात येणार आहेत. ५०० हून अधिक बसेस पहिल्या टप्प्यात चालू झाल्यानंतर इंधन व्यवस्था उभी करण्याकडे भर असेल, तसेच ‘सीएनजी’ इंधनाकडेही वळण्याचा विचार असून प्रदूषण कमी करणारी बस वाहतूक व्हावी, असा राज्य परिवहन मंडळाचा प्रयत्न आहे.
 
 
 
 
बस कोणाच्या मालकीची आहे, यावर प्रवासी प्रवास करत नाहीत. त्यामुळे ‘शिवशाही’चा प्रयोग यशस्वीच होता. सुरुवातीच्या काळात नफ्याच्या मार्गावर त्या चालवण्यासाठी तसा मार्ग शोधण्याची गरज होती. तसेच पहिल्या टप्प्यात अपघाताचे प्रमाणही जास्त होते. पण त्यावर आता मात करण्यात आली आहे. साधी बस आणि ‘शिवशाही’ यांची प्रतिकिलोमीटर मिळणारी रक्कम लक्षात घेता ‘शिवशाही’ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही घडी नीट बसत असतानाच कोरोना महामारीमुळे अडचणी आल्या. पूर्वी ५५० बसेस चालवल्या जात होत्या. आता ही संख्या २०० ते २२५ च्या घरात आली आहे.
 
 
 
योजनांना फारसा प्रतिसाद नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या जागांवर विविध प्रकल्पांसाठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा, अशा योजना आखल्या. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बाजारपेठेत तेजी आल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळू शकतो.






Powered By Sangraha 9.0