भर सामन्यात क्रिकेटपटूचा हृदयविकाराने मृत्यू !

    दिनांक  17-Feb-2021 20:23:37
|

cricket_1  H x
पुणे : भर मैदानात क्रिकेटचा सामना चालू नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. बाबू नलावडे (वय ४७) असे या तरुणाचे असून तो जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे राहणारा होता.
 
 
 
 
 
 
सामना चालू असताना तो कोसळल्यानंतर अगदी काही क्षणात इतर खेळाडूंनी बाबू नलावडे यांना नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्याकडे हलवण्यात आले. पण, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे टेनिस क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे. एखाद्या खेळाडूंचे असे मैदानावर दुःखद निधन होणे यामुळे तालुक्यात व क्रिकेट प्रेमींतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.