पोलीस महासंचालक हेमंत नगराळे चौकशीसाठी पुण्यात दाखल

16 Feb 2021 14:57:10

pooja chavan_1  
 
 
 
पुणे : खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. याअगोदर हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता हेमंत नगराळे पुण्यातल्या घटनास्थळी जाऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास पुणे पोलिस करत आहेत. त्यांच्याकडून नगराळे या प्रकरणाची डिटेल माहिती घेतील. पुण्याचे पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता. त्यानंतर नगराळे आता पुण्यात आल्याने त्यांचा हा पुणे दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. पुणे पोलिसांचे देखील पथक यवतमाळला रावण झाल्याचे कळते. तिथे जाऊन ते या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायेत का? याची चौकशी करत आहेत.
 

पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणातील संशयित अरुण राठोड अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुण पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0