मिथुनदा आणि सरसंघचालकांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2021
Total Views |
MITHUN_1  H x W
 



आगामी प. बंगालमधील निवडणुकांसाठी भेट झाली असल्याचे विरोधकांमध्ये चर्चा
 

 
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भेट घेतली . मोहन भागवत यांची मंगळवारी सकाळी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट झाली. या भेटीदरम्यान जवळपास दीड तासापेक्षा जास्त काळ या दोघांमध्ये चर्चा झाली. ही भेट कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे. पण आगामी प. बंगालमधील निवडणुकांसाठी भेट झाली असल्याचे विरोधकांमध्ये चर्चा आहे.
 
 
 
 
बॉलिवूड मध्ये काम करत असणा-या अनेक कलाकारांना कालांतराने राजकारणात यायचे वेध लागतात. आतापर्यंत अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. अभिनेत्री व अभिनेत्यांची ही नेतेगिरी कधी कधी राजकीय पक्षांना फलदायी सुद्धा ठरत आली आहे. त्यामुळेच आता बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यकार मिथुनदा म्हणजेच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना सुद्धा राजकीय मंच खुणावत आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
 
 
 
 
आजची भेट ही कौटुंबिक असल्याचे मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. आमची ब-याच दिवसांपासून एकमेकांना भेटायची इच्छा होती, पण आमच्या कामांच्या व्यस्ततेमुळे आमची भेट होऊ शकत नव्हती. आज हा योग जुळून आला, असे मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. नागपुरला त्यांनी मला सहकुटुंब बोलावले आहे, असंही मिथुनदांनी सांगितले. याआधी देखील मिथुन चक्रवर्ती आणि सरसंघचालकांची नागपूर येथे भेट झाली होती. २०१९ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील कार्यालयाला भेट दिली होती. तेव्हा दिलेल्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबात बोलले जात होते.मिथुन चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे अगोदर राज्यसभेवर खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरसंघचालक यांची भेट घेतल्याने मिथुनदा पुढे काय करणार याकडे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@