‘बराक-८’ क्षेपणास्त्र नौदलाच्या ताफ्यात सामील

    दिनांक  16-Feb-2021 12:19:37
|

barak - 8_1  H

जाणून घ्या, काय आहेत ‘बराक-८’ ची वैशिष्ट्ये !


नवी दिल्ली: पाण्यामध्येही शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता ‘बराक-८’ क्षेपणास्त्र सामील झाले आहे. डीआरडीओने इस्रायलच्या सहकार्याने याची निर्मिती केली असून क्षेपणास्त्रांची अखेरची तुकडी भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली आहे.


भारताने २०१०८ साली इस्रायलच्या एअरोस्पेस इंडस्ट्रिजसोबत (आयएआय) ‘बराक-८’ क्षेपणास्त्राचा करार केला होता. त्यानंतर डीआरडीओे आणि आयएआयने संयुक्तरित्या त्याची निर्मिती केली. यामध्ये इस्रायलने क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान आणि अल्ट्रा सिस्टीम दिली तर भारत डायनामिक्स लिमीटेडमध्ये क्षेपणास्त्रांचे उत्पादन करण्यात आले आहे.
 
 
 

‘बराक-८’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये:

१. ‘बराक-८’ भारत आणि इस्रायलतर्फे निर्मित दूरवरच्या अंतरावर मारा करू शकणारे क्षेपणास्त्र आहे.
 
 
२. विमान, हेलिकॉप्टर, अँटी शिप मिसाईल, युएव्ही, क्रूज मिसाईल आणि लढाऊ विमानांद्वारे होणार्‍या हल्ल्यापासून बचाव होईल अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
 
 
३. या क्षेपणास्त्राचा वापर इस्रायली नौदल, भारतीय वायुसेना, लष्कर आणि आता नौदलाद्वारे केला जात आहे.
 
 
४. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून त्याची मारक क्षमता ७० ते ९० किमी आहे.
 
 
५. साडेचार मीटर लांब असलेल्या या क्षेपणास्त्राचे वजन सुमारे ३ टन असून ७० किलोग्रॅमचे वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
 
 
६. या क्षेपणास्त्राची रडार यंत्रणा अतिशय अत्याधुनिक अशी आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.