भगवद्गीता, पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र जाणार अंतराळात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2021
Total Views |


bhagavatgeeta_1 &nbs




फेब्रुवारी २०२१ अखेरीस देशाचा पहिला खासगी नॅनो उपग्रह अवकाशात झेपावणार


 

चेन्नई: इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) फेब्रुवारीच्या अखेरीस देशाचा पहिला खासगी नॅनो उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. आणि या उपग्रहातून भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह २५ हजार लोकांची नावे अंतराळात पाठवली जातील.

 

 
 
हा नॅनो उपग्रह ‘स्पेसकिड्स इंडिया’ नावाची संस्था तयार करत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये अंतराळशास्त्राला आणि त्याबाबतच्या ज्ञानप्रसारला चालना देण्यासाठी महान शास्त्रज्ञ सतीश धवन यांनी स्थापन केली होती.

 

 
 
स्पेसकिड्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केसन यांचे म्हणणे आहे की, जेव्हा आम्ही या मोहिमेला अंतिम रूप दिले तेव्हा लोकांना अंतराळात पाठवण्यासाठी नाव देण्याचे आवाहन केले होते. आणि एका आठवड्यातच २५ हजार नावे प्राप्त झाली. ज्यांची नावे पाठवली जाणार आहेत त्यांना बोर्डिंग पासदेखील दिला जाणार आहे. टॉप पॅनलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे नाव व त्यांचे छायाचित्र ठेवण्यात येणार आहे. इस्रोप्रमुख डॉ. के. सिव्हन व सचिव डॉ. आर. उमा महेश्वरन यांचेही नाव खाली पॅनलवर लिहिण्यात येणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@