शवविच्छेदनातून माहिती उघड
मुंबई (प्रतिनिधी) - आज सकाळी भंडारा जिल्ह्यातील कलेवाडा येथील विहिरीत दोन बिबट्याचे मृतदेह आढळून आले. वन विभागाने या बिबट्यांचे मृत शरीर बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार विषबाधेमुळे या बिबट्यांचा मृत्यू झाला असून त्यांची नखे गायब आहेत. त्यामुळे या बिबट्यांची शिकार झाल्याची दाट शक्यता आहे.
केलवाडा येथे राखीव वनक्षेत्रापासून ६०० मीटर अंतरावर सरस्वती घोगरे यांचे शेत आहे. या शेतातील विहिरीत आज सकाळी ग्रामस्थांना दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणाची माहिती वन विभागाला मिळाताचा वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी पाहता अनावधानाने हे दोन्ही बिबिटे विहिरीत पडल्याने बिडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, बिबट्यांचे शरीर विहिरीबाहेर काढल्यानंतर धक्का बसला. कारण, या दोन्ही बिबट्यांची नखे गायब होती. पशुवैद्यकांनी केलेल्या शवविच्छेदनानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नखांसाठी या बिबट्यांची शिकार झाल्याची दाट शक्यता आहे.