पूजा आणि ‘दिशा’न्याय?

14 Feb 2021 21:17:23

pooja chavan_1  



पूजाच्या मृत्यूने राजकारणात कारकिर्द करू पाहणार्‍या तरुणींना एक धडा दिला. आज राजकारणात एक समीकरण बनले आहे. गल्लीतल्या नेत्याची मुलगीही भावी नगरसेविका. जिथे नेतेमंडळी येणार असतील तिथे हे पालक आपल्या 'अ' का 'ठ' न कळणार्‍या मुलीलाही नववधूसारखी सजवून नेत्याच्या पुढे पुढे पाठवतात. का? त्यांच्या डोक्यात पक्के बसलेले असते की, असे केल्याने मुलगी नेत्याच्या नजरेत बसू शकते. पालकच का? काही सासू-सासरेही याला अपवाद नाहीत. अर्थात, या तुलनेत पूजा गुणवान होती आणि तिचे पालक पापभिरू आहेत. पण तिचे असे का व्हावे? तिच्या पालकांचे मत काय? यावरही प्रकाश पडला पाहिजे. कारण, त्यांचे मनोगत राजकारणात उतरणार्‍या तरुणींच्या पालकांना दिशादर्शक असेल.



'दिशा’ ते ‘पूजा’! कुठे आहे न्याय? ‘कोरोना सेंटर’मध्ये ज्यांच्यावर बलात्कार झाला त्या महिलांना न्याय मिळाला? महाराष्ट्राची जनता इतकी उदासिन झाली आहे की, त्यांचे मत आहे, ”दिशा सालीयनचा मृत्यू आणि आता पूजाचा मृत्यू. दोघींनाहीन्याय मिळणार नाही. मेल्या त्या, मरू द्या. पण तथाकथित मोठ्या नेत्यांच्या, धेंडांच्या विरोधात ब्रही काढू नका.” पूजाचे नाव ‘गुगल’वर शोधले असता, ‘भावी आमदार’ म्हणून तिचा उल्लेख असलेल्या पोस्टही सापडतात. तिचे फोटो अनेक मान्यवरांसोबत दिसतात. थोडक्यात, ती ‘समाजशील’ होती आणि महत्त्वाकांक्षीही होती. तिच्या मृत्यूबाबत वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव उघड उघड घेतले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनजंय मुंडे यांच्याबाबतही अनेक चर्चा रंगल्या. पण शर्मा भगिनी चिडीचूप झाल्या. ‘त्यांना न्याय मिळेल का?’ हा प्रश्न विरतो ना विरतो तोच आता संजय राठोड प्रकरण.दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाही निघणार होता. पण पुरेसे लोक जमले नाहीत म्हणून मोर्चा रद्द करावा लागला. पूजाच्या मृत्यूवर तिच्या पालकांनी मौन स्वीकारले आहे. काय बोलणार ते तरी? मुलगी समाजासाठी काम करते, याचा सार्थ अभिमान, आनंद त्यांना असणारच. तिने नेता बनावे यासाठी त्यांचे समर्थनच असेल.‘इंग्लिश स्पिकिंग’सारख्या कोर्ससाठी त्यांनी तिला पुण्याला एकटं राहण्याची परवानगी दिली. पण पूजा देवाघरी गेली. पूजाच्या मृत्यूने राजकारणात कारकिर्द करू पाहणार्‍या तरुणींना एक धडा दिला. आज राजकारणात एक समीकरण बनले आहे. गल्लीतल्या नेत्याची मुलगीही भावी नगरसेविका. जिथे नेतेमंडळी येणार असतील तिथे हे पालक आपल्या 'अ' का 'ठ' न कळणार्‍या मुलीलाही नववधूसारखी सजवून नेत्याच्या पुढे पुढे पाठवतात. का? त्यांच्या डोक्यात पक्के बसलेले असते की, असे केल्याने मुलगी नेत्याच्या नजरेत बसू शकते. पालकच का? काही सासू-सासरेही याला अपवाद नाहीत. अर्थात, या तुलनेत पूजा गुणवान होती आणि तिचे पालक पापभिरू आहेत. पण तिचे असे का व्हावे? तिच्या पालकांचे मत काय? यावरही प्रकाश पडला पाहिजे. कारण, त्यांचे मनोगत राजकारणात उतरणार्‍या तरुणींच्या पालकांना दिशादर्शक असेल.


धर्मांतर करून काय मिळाले?


धर्मांतरित ख्रिश्चन आणि मुसलमानांना आरक्षण सवलत मिळणार नाही. खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक चांगला निर्णय समाजासाठी मिळाला. डॉ. बाबासाहेबांच्या मते, आरक्षण हे हिंदू समाजातील जातीपातीच्या गटातटात अंत्यस्तरावर असलेल्या, जे सर्व प्रकाराच्या प्रगतीपासून वंचित राहिले आहेत, अशांना आरक्षणाचा लाभ मिळावा. इथे लक्षात घ्यायला हवे की, हिंदू समाजातील जातीय उतरंडीवर असलेल्यांना आरक्षण हवे, अशी भूमिका आहे. पण सोनिया गांधींचे वर्चस्व असलेले काँग्रेस सरकार सत्तेत असताना काही वर्षांपूर्वी धर्मांतरित ख्रिश्चन आणि मुस्लिमांनाही आरक्षण मिळावे, असा डाव रचण्यात आला. यावर बरेच वादंग-चर्चा-विवाद झाले. काही लोकांचे म्हणणे होते की, बाबासाहेबांनी समान दर्जाप्राप्तीसाठी मागास समाजालाही समान संधी मिळण्यासाठी आरक्षण जाहीर केले. धर्मांतर करणारे लोक हे दुसर्‍या धर्मात जातात. ते दुसर्‍या धर्मात जातीपाती नाहीत म्हणूनच जातात ना? तिथे जीवनमान चांगले होईल म्हणूनच जातात ना? मग त्या धर्मात गेल्यावर ते जातीविरहीत जगणे जगतात का? जातच नाही, मग जातीय विषमता आणि जातीनुसार संधी नाकारणे हे होते का? मुस्लीम धर्मात जाती नाहीत, ख्रिश्चन धर्मातही जाती नाहीत, असे सांगितले जाते. धर्मांतरित मंडळी तर जुन्या धर्मातल्या सगळ्याच गोष्टी टाकाऊ समजतात. मग धर्मांतर केल्यावर जात सुटते का? जर सुटत असेल तर मग जातनिहाय आरक्षण त्यांना देणे हे चुकीचेच आहे. पण तसे नसते, तर धर्मांतरित मुस्लीम आणि ख्रिश्चन बांधवांनी कबूल करावे की, दुसर्‍या धर्मात गेल्यावरही जात त्यांना चिकटूनच आहे. पण तसे ते कबूलही करत नाहीत. कारण, तसे केल्यावर धर्म बदलला म्हणून जीवन बदलले नाही, हा त्यांचा पराभव त्यांना मान्य करावा लागेल. नवे धर्मबांधवही आपल्याला जातीच्या चौकटीतच ओळखतात, हे त्यांना कबूल करावे लागेल. मूळ ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये आणि कब्रस्थानामध्येही नव्याने धर्मांतर करून ख्रिश्चन झालेल्या लोकांना स्थान असते का नसते, हे सांगावे लागेल. धर्मांतर केल्यावर नव्या धर्मातल्या बांधवांसोबत ‘बेटी व्यवहार’ होतो का नाही, हे सांगावे लागेल. या सगळ्या प्रश्नांचे वास्तव हेच आहे की, धर्मांतर हा जीवन बदलवण्याचा मार्ग मुळीच नाही.
Powered By Sangraha 9.0