मंत्र्यासोबतच्या संभाषणातील अरुण राठोड कोण ?

13 Feb 2021 17:29:09

arun rathod_1  


मुंबई :
परळीतील तरुणी पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूंनंतर अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या कथित ऑडिओ क्लिपमधील अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.अरुण राठोडला सर्वात आधी अटक करावी, अशी मागणी पूजा चव्हाण यांच्या परळीतील नातेवाईकांनी केली आहे. अरुण राठोडला अटक झाल्यानंतर पूजाने नेमकं आत्महत्या का केली? हे प्रकरणं काय आहे? याला संजय राठोड जबाबदार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तर समोर येणार आहेत.या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहे.


समोर आलेल्या व्हायरल क्लिपमधून अरुण राठोड हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा असल्याचे मानले जात आहे. ज्यावेळी पूजाने आत्महत्या त्यावेळी अरुण राठोड हा उपस्थित होता असे व्हायरल ऑडिओ क्लिप्समधून लक्षात येते आहे. तो मूळ परळी तालुक्यातील धारावती तांडा या ठिकाणी राहत होता. पूजाच्या राहण्याची व्यवस्था अरुण राठोड याच्याकडे सोपवण्यात आली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही कौटुंबिक नातेसंबंध नाही.



प्रकरण काय ?


पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. ज्यामधून अरुण राठोड या व्यक्तीचे नाव समोर आले. भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
Powered By Sangraha 9.0