पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मंत्री संजय राठोड नॉटरिचेबल

13 Feb 2021 12:20:52

sanjay rathod_1 &nbs


मुंबई :
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात ऑडिओ क्लिप समोर येताच शिवसेनेचे नेते व मंत्री संजय राठोड यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप आक्रमक होताना दिसते आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, इतक्या सगळ्या गदारोळानंतरही संजय राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

हे प्रकरण समोर आल्यापासून व पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावर थेट आरोप झाल्यानंतरही संजय राठोड यांच्याकडून कोणतीही प्रक्रिया आली नाही. तसेच प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोनदेखील नोटरीचेबल येत आहे, त्यामुळे संजय राठोड पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर होत असणाऱ्या आरोपांवर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना किंवा मित्रपक्षातूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. संजय राठोड हे शिवसेनेचे नेते व राज्यात मंत्री पदावर असल्याकरणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार याकडेही लागले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून शिवसेना मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात असल्याचे समोर येताच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील शुक्रवारी रात्री या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणी कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत.

Powered By Sangraha 9.0