पूजाला न्याय मिळणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

pooja_1  H x W:


परळी येथील तरुणी पूजा चव्हाणच्या मृत्यूंनंतर राजकारण चांगलंच तापताना दिसतंय.पूजाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व्हावी, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पूजा चव्हाण हिचे कुटुंब नि:शब्द आहेत. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाचं कुटुंबीय करत आहेत.

कोण आहे ही पूजा चव्हाण ?


मूळची परळीची असलेली २२ वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिक्षण घेत होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय होती. मोठा फॅन फॉलोविंग वर्ग असणाऱ्या पूजाकडे बंजारा समाजातील उभरते नेतृत्व म्हणून पाहिलं जात होत. रविवारी मध्यरात्री १च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आणि रुग्णालयात नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. मात्र पोलीसांनी अशी कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र तिच्या निधनाच्या बातमीने तिच्या फॉलोवर्समधून शोक व्यक्त होत आहे. यानंतर काही क्लिप व्हायरल झाल्या.


व्हायरल ऑडिओ क्लिप ?


पूजा चव्हाण आणि कथित मंत्री यांच्यातील संभाषणाचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी लवकर या असे बंजारा भाषेत कथित मंत्र्याला बोलावते असं ऐकायला येतंय. तर सोबतच तिसरी एक व्यक्तीला तरुणीच्या मनधरणीचा प्रयत्न कर म्हणून कथित मंत्री सांगत आहे. या प्रकरणात या ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र, त्यावरून राज्यातील सरकारमधील एक मंत्री हा यात अडकू शकतो, अशी चर्चा सध्या आहे.


भाजपची चौकशीची मागणी


पूजाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे.याप्रकरणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अशी मागणी करणारे पत्रच भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.तर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ट्वीट करत पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 'पूजा चव्हाण या माझ्या मतदारसंघातील तरुणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहीजे' असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.भाजपच्या महिला आघाडीकडूनही पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.


पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक बाबी नमूद केल्या आहेत. त्या बाबी नेमक्या कोणत्या ? तर पूजा चव्हाणच्या कथितआत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, याकडेही फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले आहे.याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले, 'या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल.' पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप शिवसेनेनं कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण भाजपज्या पद्धतीनं हे प्रकरण आता समोर मांडतय ते पहाता शिवसेनेची या प्रकरणावर प्रतिक्रियाअपेक्षित आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं रितसर निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिलं आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


न्याय मिळणार का ?


गेल्या काही महिन्यात वारंवार महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षातील मंत्री असतील..नेते असतील किंवा कार्यकर्ते यांची नावे महिला अत्याचार प्रकरणात समोर आली. यापैकी एकाही प्रकरणाचा पूर्ण तपास अद्यापही समोर आला नाही. त्यामुळे मागील इतिहास बघता पूजाच्या प्रकरणात तरी हा तपास पूर्ण होणार का? आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई होणार का ? असे असंख्य प्रश्न समोर उभे राहतात.
@@AUTHORINFO_V1@@