हिंदू मंदिरासमोर 'आक्षेपार्ह फोटोशूट' प्रकरणी रिहाना अडचणीत

12 Feb 2021 15:27:57
rehana _1  H x

"आपण याबद्दल का बोलत नाही?"; संतप्त नेटकरांचा सवाल


नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्याने विदेशी कलाकार रिहाना चांगलीच अडचणीत आली होती. आणि आता ती नव्या वादात सापडली आहे ज्याचे करण आहे, तिच्या 'फिन्टी' नावाच्या अंतर्वस्त्राच्या कंपनीच्या जाहिरातीचे फोटोशुट. रिहानाच्या कंपनीसाठी झार्डन रिगन नावाच्या मॉडेलने अर्धनग्न अवस्थेत एका हिंदू मंदिरासमोर 'आक्षेपार्ह फोटोशूट' करत ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. ज्यामुळे आता नेटकऱ्यांनी रिहानावर टीका करायची सुरुवात केली आहे.
 
 
 
 
३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या झार्डन रिगन या मॉडेलने इन्स्टाग्रामवर फोटोंचा सेट ट्विट केला. हे फोटो रिहानाच्या मालकीची कंपनी फेंटीसाठी जाहिरात करणारे फोटोशूट होते. सदर फोटो #savagexfenty, #savagexgirl हॅशटॅगसह अपलोड केले गेलेले. ही छायाचित्रे एका हिंदू मंदिरासमोर अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत काढलेली आहेत; जे धार्मिक भावना दुखावणारे आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या भयंकर आक्रोशानंतर ही पोस्ट हटवली गेली.
 
 
 
 
२०२० मध्ये, रिहानाने अंतर्वस्त्राच्या एका फॅशन शो दरम्यान इस्लामिक श्लोक वापरला होता. मुस्लीम समुदायाने केलेल्या तीव्र प्रतिक्रिया नंतर रिहानाने तिच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे आता हिंदू धर्मियांकडून सुद्धा रिहानाने माफी मागावी, अशी साहजिक मागणी होताना दिसतेय.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0