नो बॉल फेकण्यात टीम इंडियाचा जगात दुसरा क्रमांक... पहिल्या क्रमांकावर

12 Feb 2021 18:52:04
tv umpire _1  H


मुंबई : कसोटी सामन्यात टिव्ही पंचांच्या सामावेशानंतर सामन्यातील नो बॉल्सचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. भारत-इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दिसून आल्या. या कसोटीत भारताने तब्बल २७ नो बॉल फेकण्यात आले. याचा विरोधी संघाला फायदा झाला. नो बॉल फेकण्याच्या बाबतीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचा आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दुसरा क्रमांक येतो.
 
 
सामन्याच्या पहिल्या डवात भारताने २० नो बॉल आणि दुसर्‍या डावात ७ नो बॉल टाकण्यात आले. कोरोना नंतरच्या खेळल्या जाणार्‍या कसोटीत पहिल्या डावात सर्वात जास्त आहे. टिव्ही पंचांच्या सामावेशानंतर अर्थात ऑगस्ट २०२० नंतर आकडेवारीवर नजर टाकली तर नऊ संघांनी २० कसोटी सामन्यात ३६ हजार ५४५ चेंडू टाकले. दरम्यान गोलंदाजांनी १४० सरासरीने २६१ नो बॉल टाकले आहेत.
 
 
प्रत्येक १४० व्या चेंडूवर नो बॉल टाकला आहे. सरासरीची तुलना ऑगस्ट २०२० पूर्वी झालेल्या २१२ कसोटी सामन्यांपेक्षा जास्त आहे. २१ कसोटी सामन्यपेक्षा जास्त आहे. २१ कसोटी सामन्यांत ११ गोलंदाजांनी ३९ हजार ५४० चेंडू टाकले आहेत. दरम्यान, ३७७च्या सरासरी १०५ नो बॉल टाकले आहेत.
 
 
पाकिस्तान कसोटी दरम्यान नियमावलीची सुरूवात
 
आयसीसीमध्ये पंचांचे निर्णय अचूक यावेत यासाठी गोलंदाजाचा पाय रेषेबाहेर पडल्यास नो बॉल देण्याचा निर्णय टिव्ही अंपाअरकडे देण्यात आलेला आहे. हा नियम कसोटीत ५ ऑगस्ट २०२० मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खेळलेल्या सामन्यापासून सुरूवात झाली आहे. नो बॉल टाकण्यात झिंम्बाबेनंतर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. कसोटी इतिहासात आतापर्यंत भारताने ५७४ सामन्यात ५२७२ नो बॉल टाकले आहेत. तर झिंब्बाबेने ११० कसोटी सामन्यात १०८५ नो बॉल टाकले आहेत.

Powered By Sangraha 9.0