राष्ट्रमंदिरासाठी खारीचा वाटा !

11 Feb 2021 18:55:01
ram _1  H x W:


गेले महिनाभर मी जेथे राहते त्या भागात राम मंदिरासाठी निधी संकलन चालू आहे. निधी संकलित करणाऱ्या टीमशी मी बोलले, त्यांचे काही सार्वत्रिक अनुभव. काही सन्माननीय अपवाद वगळता, वस्ती जितकी श्रीमंत, तथाकथित उच्चभ्रू लोकांची, तितका जास्त अनुत्साह, ॲपथी आणि कधी कधी सरळ सरळ हेटाळणी.
 
 
 
भर दुपारी घरी आलेल्या लोकांना साधं पाणी विचारण्याचं सौजन्य नाही, चहा-सरबत वगैरे देणं तर सोडाच. बरं स्वयंसेवक म्हणतात ’काही प्रश्न असेल तर मोकळ्या मनाने विचारा’, तरी काही प्रतिसाद नाही. हे लोक हॉटेलमध्ये एका जेवणावर पाच-पाच हजार रुपये सहज खर्चणारे पण राममंदिरासाठी दिले तर कण्हत-कुंथत पाचशे रुपये तेही मोठा उपकार केल्याच्या अविर्भावात दिलेले. दारात चार-चार गाड्या पण मनाची कवाडे बंद!
 
 
 
त्याउलट गावातली परिस्थिती. प्रत्येक घरी आग्रह कर-करून चहा-पाणी, कधी हळद-कुंकू लावून स्वागत. पैसे तर प्रत्येकाने दिलेच, पुरुषांनीही आणि स्वतःचे म्हणुन घरा-घरातल्या बायकांनीही. इथे पार्टीचाही (भाजप) संबंध नाही, बरेचसे लोक राष्ट्रवादीचे मतदार पण रामाचं मंदिर, सगळ्यांचं मंदिर ही भावना. स्वतःचा वेळ दवडून दारोदारी फिरणाऱ्या स्वयंसेवकांबद्दलचा आदर प्रत्येकाने बोलून दाखवला, मनापासून आदरातिथ्य केलं असं सगळ्याच स्वयंसेवकांनी आवर्जून सांगितलं. वाचकांचे काही वेगळे अनुभव असतील तर आवर्जून शेअर करावेत.
 
 
- शेफाली वैद्य, लेखिका
Powered By Sangraha 9.0