मोदी है तो मुमकीन है! प्रियांका गांधी भक्तीत लीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2021
Total Views |
Priyanka Gandhi _1 &
 
 
नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका-गांधी वाड्रा यांनी मौनी अमावस्येनिमित्त संगमात आस्थेत लीन होऊन स्थान केले. प्रियंकांनी अरेल घाटातून नावाद्वारे संगमात डुबकी घेतली. प्रियंका गांधी जेव्हा नावेवर स्वार होऊन संगमावर जात होत्या त्यावेळी माघच्या मेळ्यात श्रद्धांळूंच्या मेळ्यावर योगी सरकारच्या फेलिकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव केला जात होता. नेमक्या त्याच वेळी प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या.
 
 
 

Priyanka Gandhi १११_2&nbs 
 
 
 
गेल्या लोकसभा निवडणूकांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधींनी गंगा यात्रेपासून सुरुवात केली होती. १७ मार्च २०१९ रोजी प्रियांकांनी प्रयागराजहून जलयात्रा केली होती. प्रियंका गांधींनी प्रोटोकॉल न पाळता सर्वसामान्यांप्रमाणे आस्थेची डुबकी लावली. उत्तर प्रदेश प्रभारींचे हे रुप पाहून काँग्रेस पक्ष हिंदुत्वासाठी सॉफ्ट कॉर्नर तयार करत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी राम मंदिर भूमिपूजनानिमित्त त्यांनी देशवासीयांना राम मंदिर निर्मितीसंदर्भात पत्र लिहीले होते. त्यात वारंवार रामनाम घेतले होते.
 

Priyanka Gandhi १११_1&nbs 
 
 
 
संगम येथे मौनी अमावस्या स्नान करून प्रियांका गांधींनी नाव चालवली. उत्तर प्रदेशमध्ये मौनी अमावस्येनिमित्त श्रद्धाळू इथे स्नानासाठी येतात. गुरुवारी भोरहून पवित्र नद्यांच्या तटावर भाविकांचा मेळा भरला होता. दरम्यान लेखिका शेफाली वैद्य यांनी प्रियांका गांधींचा जूना फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या या नव्या रुपाचे स्वागत केले आणि त्याला मोदी है तो मुमकीन है, असे म्हटले.


123456 _1  H x



@@AUTHORINFO_V1@@