नोकरी शोधताय? मग 'या' व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर Hi पाठवा !

    दिनांक  11-Feb-2021 14:22:13
|

nrendra modi _1 &nbs


लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी मोदी सरकारची योजना


नवी दिल्ली:
देशातल्या बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आता मोदी सरकारने नवी योजना आणली आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर 'Hi' पाठवल्यानंतर आता तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरी मिळू शकणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने बुधवारी लाँच केलेल्या केलेल्या कृत्रिम-बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळे हे शक्य होणार आहे. द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने श्रमिक शक्ती मंच नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. जे मजूरांना त्यांच्या मूळ ठिकाणी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी व्हॉट्सअ‍ॅपवर जोडेल.
 

 
द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ देशभरात पसरला असताना त्या काळातच श्रमिकची निर्मिती झाली. देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. स्थलांतरित मजुरांना शेकडो किलोमीटर अंतरावर पायपीट करत त्यांच्या मुलांसह, कुटुंबासह आपल्या गावी परतावं लागलं. पण आता त्या सगळ्यांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल.
 
 
 
संबंधित पोर्टलवर भारतातील MSME चा संपूर्ण नकाशा आहे. नोकरीची उपलब्धता आणि त्यांना आवश्यक असलेलं कौशल्य वापरून हे पोर्टल त्यांच्या प्रांतातील संभाव्य रोजगाराच्या संधी असलेल्या मजुरांशी जोडले जाईल. ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे ते, ७२०८६३५३७० या नंबर 'Hi' पाठवून मजूर संपर्क साधू शकतात. एखाद्या मजूराने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉक्सवर मेसेज पाठवल्यानंतर पोर्टल त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाविषयी माहिती घेईल. त्याच माहितीच्या आधारे AI सिस्टम जवळच्या उपलब्ध नोकरीच्या प्रदात्याशी त्या लोकांना कनेक्ट करेल.
 

 
 
सध्या हे व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉक्सवर केवळ इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. परंतु इतर भाषांमध्येही हे पोर्टल विस्तारित करण्याचं काम सुरू आहे. ज्या मजूरांकडे स्मार्टफोन नाही किंवा व्हॉट्सअ‍ॅप नाही ते लोक ऑफलाईनद्वारे ०२२-६७३८०८०० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 'आम्ही संपूर्ण भारतातील विविध एमएसएमई आणि संबंधित संस्थांपर्यंत पोहोचलो आहोत. त्या संस्थांना, एमएसएमईना या पोर्टलवर साईन-अप करण्यासाठी विनंती केली' असल्याचंही श्रीवास्तव यांनी सांगितलं. तसंच नोकरी शोधण्यासाठी कामगारांना मोठ्या अंतरावरून प्रवास करावा लागू नये ही यामागची कल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कृषी कामगार आणि इतरांद्वारे या पोर्टलाचा वापर केला जाऊ शकतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.