अग्निसुरक्षेच्या नियमांची महाराष्ट्रात पुन्हा एकदा पायमल्ली?

10 Feb 2021 12:56:48


varsova fire_1  



वर्सोवामध्ये सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग; परिसर हादरला

 
मुंबई: मुंबईतील वर्सोव्यात एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट होत असून त्यामुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचा संपूर्ण हादरला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
 
 
 
गॅस सिलेंडरचे हे गोदाम काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अचानक आणि अनपेक्षित अशा या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. जखमींना कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूलाच एक शाळा आणि हॉस्पिटल आहे. ही बाब लक्षात घेऊन खबरदारी घेण्यासाठी हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
 
 
 
 
संपूर्ण महाराष्ट्रात अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे. गॅस सिलेंडरसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या गोदामातच जर अग्निसुरक्षा नसेल आणि असे प्रकार घडत असतील, तर आता मुंबई महापालिका त्यांच्या शब्दाला जागून काय पाऊल उचलेल हे पाहणं महत्वाचं आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0