अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराचा मूड कसा असेल ? : वाचा तज्ज्ञांचे मत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2021
Total Views |

BSE 111 _1  H x
 
 


अर्थसंकल्पानंतर कसा असेल गुंतवणूकदारांचा 'मूड' 


कोरोनाच्या सावटात देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी जाहीर केला. याचे शेअर बाजारानेही स्वागत जोरदार केले. आता गुंतवणूकदारांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे गुंतवणूकीबद्दल काय पाऊल उचलेल. अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी संजिवनी म्हणून काम करताना पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात मंदीचे वातावरण होते. आज बाजारात तेजी दिसून आली. शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रात तेजी दिसून आली. निफ्टी सुमारे ६५० अंकांनी वधारला. तो १४,२८१.२० वर कामगिरी करत होता. सेन्सेक्सने ४८,६००.६१ हजारांवर उसळी घेत दिवसअखेर २,३१४.८४ अंकांची वाढ नोंदवली.
 
 
 
शेअर बाजारात तेजी दिसून आली म्हणून खरेदी करावी, असे मूळीच नाही. तेजीचा वापर प्रॉफिट बुकींगसाठी करावी, असे मला वाटते. सरकारी बँकांमध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक मिळू शकते मात्र, ही लेव्हल खरेदी करण्याची नाही. थोडा संयम गरजेचा आहे. थोडेफार प्रमाणात कमी प्रमाणात मिळाल्या वरती खरेदी करावी एकदम खरेदी न करता टप्प्याटप्प्या ने करावी. जर आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पुढील शेअरवर नजर ठेवणे गरजेचे आहे.
 
 
येणाऱ्या काळात ह्या कंपनीचे शेअर्स आपल्याला चांगला नफा देऊ शकतात RCF ह्या कंपनीचा भाव जर ५७ च्या वरती गेला तर चांगली तेजी आपण बघू शकतो तसेच BPCL शेअर चा भाव ४०० च्या वरती गेला तर आपण ह्यात खरेदी करून उत्तम प्रॉफिट घेऊ शकतो त्याच बरोबर RCF शेअर चा भाव ५० व BPCL ३४० च्या खाली जाताना दिसत असेल तर ह्या कंपनीच्या शेअर मधून बाहेर पडावे.
 
 
खूप जणांचा असा समज झाला असेल की, बजेट चांगले होते, ठीक ठाक आहे इथून शेअर बाजाराची कमान वरतीच राहील, असे नाही. घाईगडबडीने कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करणे योग्य नाही. बाजारात माझ्यामते, १४ हजार ५०० ते ६०० लेव्हलवर मंदी येऊ शकते. मिळालेला नफा घ्यावा किमान ७० टक्क्यांवर कमावता येऊ शकतो. नफा आपल्या घरी घेऊन जावा आणि पुन्हा खालच्या पातळीवर पुन्हा गुंतवणूक करावी, असे मला वाटते.
 
 
- नितीलेश पावसकर
 
(सेबी रजिस्टर रिसर्च अनलिस्ट)
 
तनिषा शेअर मार्केट अकॅडमी
 
८६०५१६८५२५
@@AUTHORINFO_V1@@