'या' सरकारचा फ्यूज उडाला आहे : चित्रा वाघ

01 Feb 2021 20:20:37
chita wagh_1  H 

 
 
डोंबिवली : कोरोना काळात अनेकांना ५० हजारांपेक्षा जास्त वीजबिले आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा खोटारेडपणा आता जनतेपुढे उघड झाला आहे. या सरकारचाच फ्यूज उडाला असून त्यांना जनता नक्की धडा शिकवेल, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. वाढीव विजबिलाच्या मुद्द्यावर त्या बोलत होत्या. नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे अडवली ढोकळी परिसरात आयोजित हळदी कुंकू समारंभात त्या बोलत होत्या.


चित्रा वाघ म्हणाल्या, "सरकारने थकीत विजबिलाबद्दल ठोस भूमिका घेतली आहे का ?, सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल ७१ लाख ६८ हजार ५९६ वीज ग्राहकांना थेट नोटीस पाठविली आहे. या नोटशीत ग्राहकांना थकित वीजबिल भरण्याचे बजाविण्यात आले आहे. निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास वीजजोडणी कापण्याचे आदेश महावितरणाने दिले आहेत. निश्चित मुदत संपली आहे. त्यामुळे विजेची जोडणी कापण्याचे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत. तसेच सरकारने लोकलच्या वेळेमुळे नोकरदार वर्गाला काहीही फायदा होणार नाही."



Powered By Sangraha 9.0