नांदेडमध्ये पुन्हा हिंसा; रझा अकादमीच्या घोषणा, कट्टरपंथियांकडून दगडफेक

09 Dec 2021 14:21:51
nanded _1  H x



नांदेड - नांदेडमधील गाडीपुरा भागात बुधवारी मध्यरात्री इस्लामी जमावाने हिंसाचार केला असून त्यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मरही उडाला आहे.

जखमी झालेल्या एका प्रत्यक्षदर्शीने पुष्टी केली की, हिंसाचार करणारा जमाव हा “रझा अकादमी झिंदाबाद, काफिरो को मारो" असा नारा देत होता. सुमारे २०० ते ३०० लोक तलवारींसह विविध शस्त्रे घेऊन आले होते, असेही त्यांनी सांगितले. बाधित झालेल्या एका दुकानदाराने सांगितले की, दगडफेक अचानक सुरू झाली आणि ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या दुकानाची तोडफोडही झाली. एका वादातून जमावाकडून हिंसाचाराची घटना घडल्याची वृत्त आहे. यावेळी दगडफेक करण्यात आली आणि घरांची तोडफोड करण्याबरोबरच ट्रान्सफॉर्मर फोडण्यात आला. तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा अंदाज असून नांदेड पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रात्रीची वेळ असल्याने गुन्हेगारांची ओळख पटवणे कठीण होते. त्यांना सकाळी काहींना ताब्यात घेण्यात यश मिळाले. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0