मदरसे - मशिदींमध्ये वर्षानुवर्षे मुलींवर बलात्कार होत आहेत; तस्लिमा नसरीन

08 Dec 2021 17:07:19
muslim _1  H x



दिल्ली - लेखिका तस्लिमा नसरीन, ज्यांनी धार्मिक कट्टरतावादावर अनेकदा स्पष्ट भाष्य केले आहे, त्यांनी बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये दररोज बलात्कार होत असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांच्या दुरवस्थेबाबत तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे वक्तव्य केले आहे.



तस्लिमा नसरीन यांनी लिहिले आहे की, “बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये दररोज बलात्कार होत आहेत. अल्लाहच्या नावाने बलात्कार होत आहेत. मदरशातील बलात्कारी-शिक्षक, मशिदीचे बलात्कारी-इमाम मानतात की, जर त्यांनी पाच वेळा नमाज अदा केली तर ते पापातून मुक्त होतील, कारण अल्लाह क्षमा करणारा आहे." तस्लिमा यांचे हे विधान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असले तरी वास्तव हे आहे की, एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांनी मदरसा किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी बलात्कार किंवा सामाजिक गुन्हा केल्याचे अनेकदा समोर आले आहे.
 
 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की लेखिका तस्लिमा नसरीन अनेकदा एका विशिष्ट धर्माच्या कट्टरतेविरुद्ध आवाज उठवतात. कट्टरवाद्यांनी त्यांच्या विरोधात अनेकदा फतवे काढले आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला आणि आता त्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एआर रहमानची मुलगी खतिजा हिला बुरखा घातलेल्याबद्दल प्रश्न विचारला होता आणि सांगितले होते की, त्या मुलीला असे पाहून मला गुदमरल्यासारखे झाले. त्यानंतर एआर रहमानच्या मुलीने तस्लिमाला उत्तर दिले की, मला पाहून तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही ताज्या हवेत श्वास घ्यावा.
 
 
 
Powered By Sangraha 9.0