गांधींचा भारत, गोडसेमध्ये बदलतोय; मुफ्तींची मुक्ताफळे

08 Dec 2021 13:27:26
Mehbooba Mufti_1 &nb
 
 
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूब मुफ्ती यांचे पाकिस्तानी प्रेम काही लपलेले नाही. यावेळी त्यांनी 'महात्मा गांधींचा भारत, नथुराम गोडसेच्या भारतात बदलत आहे," असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी ऑक्टोबर २०२१मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्याचा संदर्भ दिला. यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी म्हंटले की, "मला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळात झालेल्या भारत - पाकिस्तान यांच्यातील एक क्रिकेट सामना आठवतो. ज्यावेळी पाकिस्तानचे नागरिक भारताचा जयजयकार करत होते. त्याचवेळी भारतातील नागरिक पाकिस्तानचा जयघोष करत होते."
 
 
मेहबूबा मुफ्ती यांनी आग्रा येथील घटनेबद्दल म्हंटले की, जिथे टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतविरोधी घोषणाबाजी केल्याबद्दल तीन पाकिस्तानी समर्थकांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी एकही वकील त्या तरुणांची बाजू घ्यायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत गांधींचा भारत गोडसेच्या भारतामध्ये बदलत असल्याचे दिसते.
 
 
२४ ऑक्टोबर २०२१रोजी पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात अनेक ठिकाणी काही लोकांनी फटाके फोडले आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणादेखील दिल्या. याचदरम्यान, श्रीनगरमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर युएपीए (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय उदयपूरच्या नीरजा मोदी शाळेतील नफीसा नावाच्या शिक्षिकेवरही कारवाई करण्यात आली. मात्र, मुफ्ती यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0