मुंबई : वरळी बीडीडी चाळ येथे मंगळवारी, दि.३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोट झाला होता. या स्फोटात एकाच कुंटुबातील तिघांचा मुत्यृ झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.
वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा. नंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि पार्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.