ज्या श्रीलंकेने पाकिस्तानला ३५ हजार नेत्रदान केले, त्यांच्याच नागरिकाला जिवंत जाळले

06 Dec 2021 15:42:24
srilanka _1  H


कराची -
पाकिस्तामध्ये श्रीलंकन ​​नागरिक प्रियंता कुमार यांची जमावाने जिवंत जाळल्याची घटना घडली. यावरून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. श्रीलंकन ​​मृताच्या पत्नीने त्यांना निर्दोष ठरवत न्यायाची विनंती केली आहे. श्रीलंकेच्या प्रियंता कुमारांवर ज्या प्रकारे निंदेच्या आरोपाखाली अत्याचार करून त्यांची हाडे तोडण्यात आली, या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या सगळ्या प्रकारामध्ये, श्रीलंकेच्या नेत्रदानाचा सर्वाधिक फायदा हा पाकिस्तानला होत असल्याचे जाणून घेण्यासारखे आहे.
 
  
१९६७ पासून श्रीलंकेने दान केलेले ३५ हजार कॉर्निया (डोळ्याची बुबूळे) पाकिस्तानी नागरिकांना मिळाले आहेत. डॉक्टर नियाज बरोही यांनी ही माहिती दिली आहे, जे पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या नेत्ररोग तज्ञांपैकी एक आहेत. ते पाकिस्तानच्या 'श्रीलंका नेत्रदान संस्थे'चेही सदस्य आहेत. मात्र, श्रीलंकन नागरिक प्रियंता कुमारांचा माॅब लिंचिंगमध्ये मृत्यू झाल्याने डॉ. बरोही खूप दुःखी आहेत. इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या या कृत्याचा जगभरातून विरोध होत आहे.
 
 
ते म्हणतात की, देशातील अनेक लोकांप्रमाणे आपणही दुःखी आहोत कारण आपले डोके शरमेने झुकले आहे. कराचीतील प्रसिद्ध 'स्पॅन्चर आय हॉस्पिटल'चे प्रमुख असलेले डॉ. बरोही यांनी आतापर्यंत अनेक कॉर्निया प्रत्यारोपण करण्यात यश मिळवले आहे. श्रीलंकेने आतापर्यंत जगाला ८३ हजार २०० कॉर्निया दान केल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला आहे. कारण त्याला एकूण देणग्यांपैकी ४० टक्के रक्कम मिळाली आहे.
 
 
प्रियंता कुमारा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका कपड्याच्या कारखान्यात महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते. पाकिस्तानातील कट्टरपंथी इस्लामी संघटना 'तेहरिक-ए-लब्बैक'नेही हल्ला करून कारखान्याची तोडफोड केली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडलेल्या या घटनेबाबत इम्रान खान यांच्या सरकारवर दबाव आणि कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९०० लोकांना दहशतवादाच्या कलमांतर्गत आरोपी बनवण्यात आले असून त्यापैकी २३५ जणांना अटकही करण्यात आली आहे. त्यापैकी १३ मुख्य आरोपी आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0