मुंबईत ओमायक्रॉन विषाणूची एंट्री

06 Dec 2021 23:35:18

 
omicron_1  H x

 
 
 
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. नव्याने पसारात असलेल्या या ओमायक्रॉन विषाणूचे आतापर्यंत राज्यात ८ रुग्ण आढळले होते. त्यातच मुंबईकरांना सतर्क करणारी बाब म्हणजे याच नव्या विषाणूने आता मुंबईत देखील प्रवेश केला असून शहरात या विषाणूने बाधित झालेल्या २ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनची (Omicron Cases in Maharashtra) लागण झालेल्या रुग्णांची संख्या दहा झाली आहे.
 
 
 
दि. २५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून मुंबईत आलेल्या एका ३७ तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून मुंबईत दाखल झालेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणिलाही ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आलं आहे.
 
 
 
प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार या दोन्ही रुग्णांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांचा प्रशासनातर्फे शोध घेण्यात आला आहे.
 
 
 
राज्यात एकूण किती ओमायक्रॉन रुग्ण ?
महाराष्ट्र - 10
डोंबिवली - 1
पुणे - 1
पिंपरी चिंचवड - 6
मुंबई - 2
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0