केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ

04 Dec 2021 16:11:10

Narayan Rane_1  
मुंबई : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राणेंच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यानुसार राणे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. यानुसार आता सीआयएसएफच्या ८ कमांडोंचे कवच राणेंच्या सुरक्षेत असणार आहेत, आधी केवळ २ कमांडो होते. तसेच सुमारे ३४ सशस्त्र पोलिस २४ तास पहारा देणार आहेत.
 
 
नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला होता. नुकताच हा अहवाल गृहमंत्रालयाला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सीआयएसएफचे ८ कमांडोचे कवच राणे यांना सुरक्षा देणार आहे. आता शनिवारपासून राणेंचे सुरक्षा कवच ‘झेड’ श्रेणीचे होणार आहे. त्याबाबतचे आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलास (सीआयएसएफ) देण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0