चीनमध्ये का करण्यात आली गौतम बुद्धांची ९९ फूट उंच मुर्ती नष्ट ?

30 Dec 2021 14:11:34

Gautam Buddha




बिजिंग : मुसलमानांच्या मशिदी नष्ट केल्यानंतर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने आता बौध्द धर्मीयांच्या धर्मस्थळांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सुचिआन प्रांतातील ९९ फूट उंच गौतम बुध्दांची मुर्ती नष्ट केली असून ४५ प्रार्थनास्थळे हटवण्याचे कृत्य या सरकारकडून करण्यात आले. तिबेटियन लोकांसाठी प्रार्थनीय असणारे झेंडेसुध्दा जाळण्यात आले. हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांनी कँडलमार्च काढून यास विरोध दर्शवला आहे.
 
 
 
'भविष्यात येणाऱ्या संकटांपासून आपले संरक्षण व्हावे', या श्रध्देतून २०१५ रोजी गौतम बुध्दांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली होती. "चीनी सरकारने हे कृत्य करून आमच्या धर्म, भाषा आणि संस्कृतीवर हल्ला केला आहे. ही अतिशय दुर्दैव्याची गोष्ट आहे." असे म्हणत तिबेटियन लोकांनी घटनेचा निषेध केला आहे. यापूर्वी कागदपत्रांची अपूर्तता आणि बेकायदेशीरपणे जमिनीचा वापर केल्याच्या आरोपावरून ड्रॅगोमध्ये असणारा मठ पाडण्याचे कृत्य या सरकारने केले होते. त्यांनी उध्वस्त केलेल्या शाळांमुळे १३० विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0