उत्तर प्रदेशची निवडणुक ठरलेल्या कालावधीतच होणार – निवडणूक आयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2021
Total Views |
eci

5 जानेवारी रोजी येणार अंतिम मतदार यादी
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोनाविषयक नियमांचे पालन करून निश्चित वेळेतच निवडणुक घ्यावी, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांनी केली आहे. त्यामुळे येत्या 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहिर केली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणुक आयुक्त सुशील चंद्रा यांनी गुरुवारी लखनऊ येथे पत्रकारपरिषदेत दिली.
 
 
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील करोना स्थितीचा आढावा केंद्रीय निवडणुक आयोगाच्या पथकाने घेतला. त्यानंतर पत्रकारपरिषदेत आयोगाने सांगितले, राज्यात करोना नियमांचे पालन करून ठऱलेल्या मुदतीमध्येच मतदान घ्यावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. त्यामुळे आयोग त्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेणार आहे. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागांमध्ये मतदान केंद्र असून नये, याविषयीदेखील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. सध्या राज्यात मतदार नोंदणीचे काम सुरू असून आतापर्यंत 15 कोटींहून अधिक मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 23.9 लाख पुरुष तर 28.8 लाख महिला आहेत, 52.8 लाख नवे मतदार असून 18 ते 19 दरम्यान वय असलेले 19.89 लाख युवा मतदार आहेत. अंतिम मतदार यदी 5 जानेवारी रोजी जाहिर केली जाणार असून त्यानंतर निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे.
 
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार आहे. किमान 800 मतदान केंद्रे उभारली जातील जिथे फक्त महिला मतदान अधिकारी असतील. मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त मतदार इतर 11 कागदपत्रे दाखवून मतदान करू शकतो. यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1500 लोकांऐवजी 1250 लोकांसाठी एक बूथ करण्यात आला आहे. यामुळे 11 हजार बूथ वाढले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, वीज आणि शौचालयाची सुविधा असेल. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था असेल. किमान एक लाख बूथवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून जेणेकरून लोकांना मतदान पूर्ण पारदर्शकतेने होईल हे पाहता येईल. राज्यात 2017 मध्ये, लिंग गुणोत्तर 839 होते, म्हणजे 1000 पुरुषांमागे 839 महिला मतदार होत्या. यावेळी ती वाढून 868 झाल्याचीही माहिती आयोगातर्फे देण्यात आली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@