लग्नासाठी कमीतकमी वय २१ : 'निकाह'साठी मशिदींबाहेर रांगा

30 Dec 2021 14:18:23

Hyderabad
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मुलींचे किमान वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, अद्याप याबाबत कोणताही कायदा आलेला नाही. असे असले तरीही काही मुस्लीम कुटुंबांमध्ये या कायद्यामुळे भीती निर्माण झाली आहे. त्यांना लवकरात लवकर मुलींचे लग्न करायचे आहे. त्यामुळे निकाहसाठी हैदराबादच्या जुन्या शहरामधील मशिदींबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये झालेल्या विवाहांमध्ये सहभागी झालेल्या वधू-वरांचे वय १८ ते २० वर्षांच्या दरम्यान सांगण्यात येत आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या विवाहांमध्ये बहुतेकांचे लग्न २०२२-२०२३मध्ये होणार होते. पण आता लग्नाच्या किमान वयाशी संबंधित नवा कायदा येण्याच्या भीतीने त्यांचे कुटुंबीय थांबायला तयार नसल्याचे समोर आले. टाइम्स ऑफ इंडियाने जुन्या शहरात राहणाऱ्या कमीतकमी अर्धा डझन कुटुंबांशी संवाद साधला. त्यांनी याच कारणासाठी आपल्या मुलींच्या लग्नाच्या तारखा बदलल्या आहेत. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे लग्न असूनही कुटुंबीयांनी 'विदाई'चा सोहळा तूर्तास पुढे ढकलल्याचे अहवालात म्हटले आहे.
 
 
एका १९ वर्षीय मुलीच्या आईने सांगितले की, तिला तीन मुली आहेत. त्यापैकी एक अपंग आहे. अशा स्थितीत ती आपल्या एका मुलीच्या लग्नासाठी आणखी दोन वर्षे कशी वाट पाहणार? दुसरीकडे बाबानगर येथील एका महिलेने सांगितले की, तिचा नवरा कमाईसाठी श्रीलंकेत गेला असून तो परतल्यानंतर २०२२च्या मध्यात आपल्या मुलीचे लग्न करायचा विचार करत होता, मात्र या विधेयकाची माहिती मिळाल्यानंतर तिने घाईघाईने हे पाऊल उचलले आहे.
 
 
याआधी हरियाणातील मेवातमधूनही अशीच बातमी समोर आली. मुस्लिमबहुल नूह भागातील काही मुस्लीम कुटुंब २ दिवसात लग्न करण्यास तयार असलेल्या मुलांचा शोध घेत आहेत. इमामांना वर मुलगा शोधण्यासाठी एवढ्या मागण्या आल्या आहेत की, आता अजानच्या वेळी या संदर्भात घोषणा करू लागले आहेत. नुह जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष साजिद यांनी यावेळी सांगतले की, "आमचा या कड्याला आक्षेप आहे. जे सुशिक्षित आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काही उद्देश आहे त्यांच्यासाठी हा कायदा ठीक आहे. पण ज्यांचे कोणतेही ध्येय नाही, जे अशिक्षित आहेत, त्यांचे पालक लग्न न केल्यास त्यांच्या मुलींना ते ओझे समजतात."
 
 
Powered By Sangraha 9.0