मालेगाव स्फोटप्रकरणी हिंदूंना अडकविण्याचा प्रयत्न पुन्हा उघड

29 Dec 2021 11:31:34
Hindu _1


 

 
 
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे. मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत साक्षीदाराने दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.



2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्या न्यायालयात या प्रकरणात दैनंदिन सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत ह्या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक ४० यांनी अतिशय धक्कादायक खुलासे न्यायालयासमोर केले.
 
 
 
एटीएस अधिकाऱ्यांचा साक्षीदारावर दबाव



साक्षीदाराने न्यायालयाला साक्ष देताना सांगितले की, एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आपल्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल, असे म्हणत दबाव टाकला होता. तसेच आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावंचा उल्लेख करावा ह्यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा साक्षीदाराने मंगळवारी झालेल्या सुनावणीत केला.



या उच्चपदस्थ व्यक्तींमध्ये उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, तत्कालीन कार्यकर्ते सुनील देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे आपल्या जबाबात नोंदवावी, यासाठी एटीएस साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याची माहिती साक्षीदाराने कोर्टात दिली. साक्षीदाराने एटीएसचे तत्कालीन अधिकारी परमवीर सिंह आणि डीसीपी श्रीराव यांच्या संदर्भात आक्षेप सुद्धा साक्षीदाराने नोंदवले आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये 15 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे.
 
 
 
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा इतिहास



29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिद परिसरात मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने तीन वर्षे प्राथमिक तपास केल्यानंतर हे प्रकरण 2011 मध्ये एनआयएकडे वर्ग करण्यात आले होते. एनआयएच्या



मुंबईतील विशेष न्यायालयात सध्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यासह आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी
आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.



 
 
 
 
Powered By Sangraha 9.0