तुम्हीही कापडी मास्क वापरता का? : डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा

"कोरोना" अपडेट्स : कापडी मास्क वापरणाऱ्यांसाठी मोठा धोका!

    दिनांक  29-Dec-2021 18:45:15
|

MASK _1नवी दिल्ली : जगभरातील डॉक्टरांच्या मते, फेस मास्क (Face Mask)  वापरणे हेच आता कोरोनाशी लढाईचे महत्वाचे शस्त्र राहीले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या भाषणात नुकताच या गोष्टीचा उल्लेख केला होता. नागरिकांनी मास्क वापरण्याची सवय सोडून दिल्यानं त्यांनी चिंताही व्यक्तही केली होती.


या सगळ्यातही मास्कचा वापर आणि त्याबद्दल योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संक्रमणासाठी तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. केवळ  (cloth masks) कापडी मास्क वापरणाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण होणे कठीण आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कापडी मास्क (cloth masks) वापरल्याने काय नुकसान होणार ?

कापडी मास्क  (cloth masks) वापरल्यामुळे विषाणू नाकावाटे शरीरात जाण्याची शक्यता वाढते. मोठ्या ड्रॉपलेट्सद्वारे विषाणू आर-पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकन कॉन्फ्रेंस ऑफ गवर्मेंटल इंडस्ट्रियल हाईजीनिस्ट्सद्वारे दिलेल्या माहितीनुसार, कपड्याचे मास्क हे ७५ टक्के कुचकामी ठरतात.


या संशोधनात आढळलेल्या माहितीनुसार, कपड्याचे मोठे मास्क मेडिकल ग्रेड मास्कसारखे चांगले काम करत नाहीत. अमेरिकन हेल्थ एजेंसी सेंटर्स फॉर डिसीस कंट्रोलचे म्हणणे मानले तर N95 मास्क हा कोरोनाने ९५ टक्के संरत्रण करतो. तसेच डिस्पोजेबल मास्क ८५ टक्के सुरक्षित आहे.


जाणकारांचे म्हणणे काय?


CNNच्या मेडिकल एनालिस्ट डॉ. लियाना वेन यांच्या मते, कापडी मास्क  (cloth masks) केवळ चेहऱ्याच्या शोभेसाठी उपयुक्त आहेत. आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचा काहीही उपयोग नाही. ओमिक्रॉनचा धोका पाहता कुठल्याही प्रकारे कापडी मास्क वापरा, असा सल्ला आम्ही देणार नाही.नागरिकांना किमान तीन आवरणे असलेला सर्जिकल मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यांना डिस्पोजल मास्कही म्हटले जाते. बाजारात हे मास्क सहज उपलब्ध होत असतात. वापरायचेच असतील तर तुम्ही आधी डिस्पोजल मास्क आणि त्यावर कापडी मास्कही (cloth masks) वापरू शकता. गर्दीच्या ठिकाणी जाताना केवळ N95 आणि K95 मास्क वापरणेच बंधनकारक केले पाहिजे. तसे न केल्यास विषाणू नाक आणि तोंडावाटे शरीरात जाऊ शकतो.


मास्क वापरताना अशीही काळजी घ्या!
मास्क वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे मास्कची फिटींग कशी आहे. मास्क वापरण्यामुळे कुठला संसर्ग तर होत नाही ना, कुठे मास्कला गळती तर लागत नाही ना, मास्कद्वारे नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकलेली हवी. दोन मास्क वापरल्याने सुरक्षाही दुप्पट मिळते.

N95 आणि K 95 मास्कमध्ये नेमका फरक काय आहे ?

तज्ज्ञांच्या मते, N95 आणि K95 हा एकच प्रकार आहे. फरक इतकाच की याचे लायसनिंग लोकेशनमध्ये बदल आहेत. अमेरिकेत याला N95 म्हटले जाते तर चीनी लोक त्याला K95 मास्क म्हणतात.


जगभरात बदलल्या मास्क वापरण्याच्या पद्धती

जर्मनी आणि ऑस्ट्रिया आदी देशांनी मास्क परीधान करण्याच्या स्टँडर्डमध्ये बदल केले आहेत. त्यावेळी सार्वजनिक जागांवर सर्जिकल मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. इतर देशात ही अट लागू केलेली नाही. भारतात सध्या मास्क वापरणे हेच बंधनकारक आहे. याच महिन्यात मास्क ऐवजी रुमालाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, असा इशारही देण्यात आला होता.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.