१ जानेवारीला '5G' येणार! जाणून घ्या! मोबाईल सेवेत काय बदल होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2021
Total Views |

%G_3



नवी दिल्ली :
एकविसाव्या शतकातील इंटरनेटच्या दुनियेत ज्याला म्हणू शकतो, असं 5Gचं जग २०२२ या वर्षात अवतरणार आहे. व्हॉट्सअप कॉलिंगमध्ये येणाऱ्या अडचणी, ओटीटीवर सिनेमा पाहताना होणारं बफरींग या सर्व गोष्टी आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. 5G च्या अवतारानंतर या तक्रारीही राहणार नाहीत.

हायस्पीड इंटरनेटद्वारे आता व्हॉट्सअॅप कॉलिंगचा विनासमस्या अनुभव, २० सेकंदात सिनेमा डाऊनलोड, विना बफरिंग यूट्यूबवर व्हीडिओ पाहता येणार आहेत. १ जानेवारीपासून चार दिवसांत पहिल्यांदाच मंगळवारी देशातील १३ शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली जाणार आहे.



%G_2


या १३ शहरांमध्ये 4Gच्या तुलनेनत इंटरनेट स्पीड दहा पटींनी वाढणार आहे. 5G इंटरनेट सेवा सुरू करणाऱ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे. गुजरातमधील ३ शहरांचा सामावेश असणार आहे. इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांती आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कशी येणार इंटरनेट क्षेत्रातील क्रांती जाणून घेऊयात या पाच मुद्द्यांवरुन


१. देशातील कुठल्या १३ शहरांमध्ये सुरू होणार 5G इंटरनेट सेवा?
२. 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी हीच १३ शहरे का निवडली?
३. 5G इंटरनेट सेवा म्हणजे नेमकं काय ?
४. 5G इंटरनेट आल्यानंतर काय फायदा होणार?
5. 5G इंटरनेट सेवेसाठी भारत सज्ज आहे का?

भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात तीन बड्या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांचा सामावेश आहे. भारती एयरटेल, रिलायंस जियो आणि वोडाफोन-आइडिया कार्यरत आहेत. तीन कंपन्यांसाठी मोबाईल एक्सेसरीज तयार करण्यासाठी इरिक्सन आणि नोकियाशी हातमिळवणी करत काम सुरूही केले आहे.





%G_1


१३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची प्रमुख तीन कारणे आहेत. नोकिया आणि एरिक्सन कंपनीच्या सुरुवातीला चाचणी करत आहेत. त्यात या १३ शहरांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही तितकीच जास्त आहे. चाचणीसाठी याच शहरांतील युझर्सची निवड करण्यात आली आहे. 5G इंटरनेट सेवा देणाऱ्यांच्या तुलनेत 4Gच्या तुलनेत अधिक खर्चिक आहे. या इंटरनेट नेटवर्कला पाचवी पीढी 5G म्हणून संबोधले जाते. ही एक वायरलेस ब्रॉडबँण्ड इंटरनेट सेवा है असून हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करते.

5G इंटरनेट सेवेत मुख्यतः तीन प्रकारच्या फ्रीक्वेंसी बँण्डविथ असतात.

1. लो फ्रीक्वेंसी बँण्ड- विभागीय आकारमानानुसार, सर्वात चांगल्या प्रकारचा इंटरनेट स्पीड 100mbps हा सर्वात कमी मानला जातो.
2. मिडीयम फ्रीक्वेंसी बँण्ड- 100mbps नंतर सिग्नलच्या बाबतीत समाधानकारक मानला जाणारा मिडीयम फ्रीक्वेंसी बँण्ड हाच आहे. त्यात 1.5gbps इतका स्पीड मिळतो.
3. हाय फ्रीक्वेंसी बँण्ड - इंटरनेट स्पीडमध्ये सर्वात जास्त वेग आणि सर्वात जास्त एरीया कव्हर करणारा हाय फ्रीक्वेंसी बँण्ड हा 20gbps इतका असतो. जास्त युझर्सची संख्या असूनही वेगावर काहीही परिणाम होत नाही.



5G सेवा सुरू झाल्याने काय फायदा होणार?


5G इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर आता भारतात मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता आहे. केवळ मनोरंजन आणि दैनंदिन इंटरनेट वापर हा विचार सोडल्यास नवे रोजगार, नव्या संधी खुणावणार आहेत. 5G साठी काम करणाऱ्या एरिक्सन या कंपनीने दिलेल्या माहितीचा विचार केल्यास पाच वर्षांत भारतात तब्बल 50 कोटींहून अधिक इंटरनेट युझर्सचा आकडा पोहोचू शकतो.

जाणून घेऊयात याचे फायदे काय होणार
सर्वात जास्त वेगवान इंटरनेटमुळे चांगला अनुभव मिळणार
गेमिंग क्षेत्र जे संपूर्णपणे चांगल्या इंटरनेटवर अवलंबून आहे, त्यातही मोठी क्रांती होऊ शकते.
ओटीटी, युट्यूब सेवा दूरवर पोहोचल्याने तिथेही मोठा प्रेक्षकवर्ग तयार होणार
इंटरनेट कॉलिंगची सेवा जबरदस्त होणार
20 सेकंदात एखादा सिनेमा डाऊनलोड करता येऊ शकतो.
कृषी, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात इंटरनेट क्रांती आणू शकतो.
चालकरहीत मेट्रो किंवा विना चालक वाहनांच्या चाचण्यांची सुरुवात होईल.
वर्चुअल रियलटी आणि फॅक्ट्रीमध्ये रोबोटचा वापर करणे सोपे होऊन जाईल.
फेसबूकने केलेल्या मेटावर्सच्या घोषणेनंतर आता 5Gची क्रांती वेग आणणार आहे.
संगणकीकृत जीवनशैली सुरू होईल.

केंद्र सरकारच्या मते, मार्च-अप्रैल 2022 पर्यंत 5G इंटरनेट स्पेक्ट्रमसाठी बोली सुरू होणार आहे. 5G सुरू करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. 5G इंटरनेट सुरू करण्याचा अंतिम निर्णय आता टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) करणार आहे. भारती एयरटेलने हैदराबादमध्ये कमर्शियल 5G इंटरनेट सेवेची यशस्वी चाचणी केली जाईल.


कोणत्या १३ शहरांमध्ये सुरू होणार 5G सेवा?

मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, नवी दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ इत्यादी.




@@AUTHORINFO_V1@@