कारवाई करा पण १२ महिने कोणाला बाहेर पाठवू नका!

28 Dec 2021 18:43:28
 
Ajit Pawar_1
 
 
 
 
 
मुंबई : विधानभवन परिसर आणि सभागृहातील सदस्यांच्या वर्तनासंदर्भातील आचारसंहितेबाबत आज विधानभवनात बैठक झाली. या बैठकीनंतर आदर्श आचारसंहिता आणि नियमावली सर्व सदस्यांना देण्यात आली आहे.
 
 
याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज सर्व सन्मानीय सदस्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. राज्यातील जनता या सभागृहातील सदस्यांच्या वर्तनाचे बारकाईने लक्ष ठेवून असते. इथे येणारे सदस्य सहकार क्षेत्रातील अनुभवी, नगरपालिकेचे सदस्य, काही नविकोरी पाटी असतात मात्र त्यांना जनतेची काम करण्याची ईच्छा, पंचायत समितीचे सदस्य ही आपली परंपरा आहे.
 
त्यामुळे सार्वजनिक सदस्य कसा वागतो याची जाणीव सर्वांनी ठेवावी. आपल्या वर्तनामुळे सभागृहाच्या मान सन्मानाला धक्का बसला आहे. त्यामुळे सभागृह आवारात आणि सार्वजनिक जीवनात व्यक्त होताना अंतर्मुख होऊन विचार करण्याची आज गरज आहे, असेही सर्व आमदारांना सांगितले.
 
पुढे बैठकीची माहिती देताना ते म्हणाले, बैठकीत जी चर्चा झाली यात सगळ्यांचे एकमत होते. त्यामुळे या सभागृहाचे सभ्यचार आणि राजशिष्टाचाराचे पालन करावे. सभागृहाच्या सदस्याला शोभेल, रुचेल असे वर्तन असावे.
 
यावेळी अजित पवार यांनी भाजपच्या १२ आमदारांवरील निलंबन हे चुकीचं असल्याचेही नमूद केले. ते म्हणाले, "ही पुस्तिका आपल्याला मिळाली आहे मात्र त्याचे वाचनही केले पाहिजे. आपण कुत्रे, मांजर, कोंबड्या यांचे प्रतिनिधित्व करत नाही. चारही पक्ष, अपक्ष यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. चुकीची जाणीव अध्यक्षांनी संबंधित सदस्याला द्यावी. कारवाई करताना ४ तास एखाद्याला बाहेर ठेवा, चार तास कमी होत असेल तर एक दिवस बाहेर ठेवा. मात्र १२-१२ महिने बाहेर ठेवणं योग्य नाही", असे म्हणत अजित दादांनी १२ आमदारांवर झालेल्या करवाईवर भाष्य केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0