तेलंगणा - छत्तीसगड सीमेवर पोलिसांची कारवाई ; ६ नक्षलवादी ठार

27 Dec 2021 12:27:06

naxals_1
मुंबई : तेलंगणा आणि छत्तीसगड दरम्यानच्या सीमेवर नक्षलवाद्यांसोबत तेलंगणा ग्रे हाउंड्स आणि छत्तीसगड पोलिसांची चकमक झाली. सुकमा जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलांना ६ नक्षलवादी ठार करण्यात यश आले. तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. तेलंगणाचे कोथागुडेम पोलिस अधीक्षक सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, चार्ला झोनपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्नवल्ली-पेसरलापाडू वनक्षेत्रात ही चकमक झाली. ६ नक्षलवाद्यांपैकी ४ महिला आहेत आणि एक चार्ला भागातील मिलिशिया कमांडर मधु आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केले असून अद्याप शोध मोहीम सुरू आहे. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या किस्ताराम पीएस सीमावर्ती भागातील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुनील दत्त यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0