ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान!!!

    24-Dec-2021
Total Views | 125
BANK _1




मोबाईल, संगणकाचा वापर करुन ऑनलाईन बँकिंग व्यवहार ही आता नित्याची बाब झाली असली तरी असे डिजिटल व्यवहार करताना फसवणुकीचे प्रमाणही वाढलेले दिसते. त्यामुळे वारंवार ग्राहकांना विविध माध्यमातून यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येते. तेव्हा, आज ‘भारतीय ग्राहक दिना’निमित्त ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाच्या छोट्या-मोठ्या खबरदारीच्या उपाययोजनांविषयी...
 
 
 
 
बँक कधीच तुम्हाला ‘अकाऊंट डिटेल्स’ विचारात नाही. पिन तर कधीच नाही. त्यामुळे जो कोणी तुम्हाला ही माहिती मागतो, तो नक्की भामटा आहे, हे लक्षात ठेवा. माहीत नसलेल्या व्यक्तीस ऑनलाईन पेमेंट करू नका. आजकाल कोणाला बँकेत जायचे नसते आणि सर्व व्यवहार घरून मोबाईल किंवा इंटरनेटद्वारेच करायचे असतात. इंटरनेट वापर करताना जर कुठे चूक झाली आणि आपला डेटा चोरीला गेला तर? त्यासाठी एक युक्ती आहे. ज्या अकाऊंटमधून इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करायचे आहेत, त्या अकाऊंटमध्ये एक मर्यादित रक्कमच ठेवायची आणि ती रक्कम संपली की, तिथे पुन्हा रक्कम ट्रान्सफर करायची. म्हणजे आपले इतर सर्व अकाऊंट ‘रिस्क’पासून वाचवू शकतात.
 
 
 
 
ऑनलाईन आर्थिक फसवणूक
 
सध्या आपण आर्थिक फसवणुकीबद्दल बरेच ऐकतो-वाचतो. इंटरनेट किंवा फोनचा वापर आपल्या आर्थिक व्यवहाराचा अविभाज्य हिस्सा झाला आहे. याचा फायदा घेऊन बदमाश मंडळी आपले आर्थिक नुकसान करू इच्छितात. म्हणून आज आपण ‘ऑनलाईन’ आर्थिक व्यवहार आणि संबंधित फसवणूक याबाबत आढावा घेणार आहोत.
 
 
 
मोबाईलचा वापर
 
 
आपल्या फोनमध्ये कुणीही अनोळखी माणसाने पाठवलेली अ‍ॅप्स ‘डाऊनलोड’ करू नका. लॉटरी लागली आहे, ‘इस्टेट’ द्यायची आहे, असे मेसेज, ई-मेल तत्काळ ‘डिलिट’ करा. अशा ठिकाणी चुकूनही छोटेही ‘पेमेंट’ करू नका. म्हणजे पुढे होऊ शकणार्‍या अपघातापासून बचाव. मोबाईल ‘चार्जिंग’बाबत सतर्क राहा. ‘चार्जिंग पोर्ट’चा उपयोग ‘डेटा’ चोरी करता होऊ शकतो. स्वतःची ‘पावरबँक’ ठेवणे हा त्यावरील उपाय.
 
 
 

सीमकार्डबद्दलची माहिती कुणालाही देऊ नका.
 
 
जर मोबाईलला फार वेळ नेटवर्क नाही, असे आढळून आले तर लगेच मोबाईल सेवा देणार्‍या कंपनीकडे विचारणा करा. ‘डुप्लिकेट’ सीमकार्ड तर ‘इश्यू’ होत नाही ना, याची खात्री करून घ्या. गंमत म्हणून मोबाईलचे अ‍ॅप कुठून तरी ’डाऊनलोड’ करू नका.
 
 
 
इंटरनेट वापरताना...
 
 
‘सिक्युअर्ड इंटरनेट’चा वापर करा. कुठलेही अनोळखी नेटवर्क वापरू नका. संकेतस्थळावर ‘क्लिक’ करताना खात्री करून घ्या. थोडासा बदल केलेल्या संकेतस्थळे तुम्हाला फसवणुकीच्या जाळ्यात ओढू शकतात. माहीत नसलेल्या संकेतस्थळ लिंक्सवर ‘क्लिक’ करू नका. ‘ऑनलाईन जॉब पोर्टल’पासून सावध राहा. अनोळखी व्यक्तीबरोबर ‘स्क्रीन शेअर’ करू नका, तसेच असे अ‍ॅप ‘डाऊनलोड’ करू नका. ऑनलाईन विक्री करताना तुमचा पिन मागितल्यास सतर्क व्हा. पैसे घेताना पिन द्यावा लागत नाही. 
 
 
 
इंटरनेट/मोबाईल बँकिंग
 
 
 बँक कधीच तुम्हाला ‘अकाऊंट डिटेल्स’ विचारात नाही. पिन तर कधीच नाही. त्यामुळे जो कोणी तुम्हाला ही माहिती मागतो तो नक्की भामटा आहे, हे लक्षात ठेवा. माहीत नसलेल्या व्यक्तीस ‘ऑनलाईन पेमेंट’ करू नका.
 
 
 
 
क्रेडिट/डेबिट कार्ड वापरताना...
 
 
आपला पिन दुसर्‍याला दिसणार नाही, एवढी काळजी घ्या. कार्ड स्वाईप करताना ते आपल्या समोरच होते आहे ना, ही खात्री करून घ्या. मशीन आपल्यापर्यंत आणायला सांगा. आपला पिन सांगू नका. ‘एटीएम’ वापरताना दुसरा कोणी आपल्या शेजारी नाही, अशी खात्री करून मगच पिन वापरा तसेच पिन नंबर टाकताना ‘की-बोर्ड’ आपल्या दुसर्‍या हाताने ‘कव्हर’ करा. अदृश्य कॅमेरा असल्यास बचाव. तक्रार करायची वेळ आल्यास खालील माहिती संग्रही ठेवा. तत्काळ ‘ऑनलाईन’ तक्रार करता येईल.
रिझर्व्ह बँकेकडे ‘ऑनलाईन’ तक्रार करायची असल्यास https://cms.rbi.org.in/
‘सायबर’ गुन्ह्यासंबंधी पोलिसात ‘ऑनलाईन’ तक्रार करायची असल्यास
  





- प्रदीप भावे 

अग्रलेख
जरुर वाचा
पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ ​​दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ ​​सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121