डोंबिवली बलात्कार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा विषय विधानसभेत प्रश्न...

23 Dec 2021 16:39:26
 
ganpat gaikwad photo_1

डोंबिवली : डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता. त्यावर गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे. या उत्तरात आरोपींपैकी एक आरोपी तीन महिन्यानंतरही मोकाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
 
डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हीडिओ बनवून त्याआधारे २९ तरुणांनी सामुहिक बलात्कार केला होता. या प्रकरणाला वाचा फुटल्यावर राज्याला हादरा बसला होता. या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यासाठी आंदोलनेही झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता.
 
डोंबिवलीतील सामुहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी २९ आरोपींना अटक केली. त्यात चार विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. मात्र, एका आरोपीचा शोध सुरू आहे. दुर्देवी मुलीवर सुमारे आठ महिन्यांच्या काळात अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तरात दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0