नवी दिल्ली : सध्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमारचा एक व्हिडियो जोरदार चर्चेत आला आहे. या व्हिडियोमध्ये त्याला जेएनयुमधील त्याचा सहकारी उमर खालिदशी असलेल्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कन्हैया कुमार म्हणाला की उमर खालिद माझा मित्र आहे, हे कोणी सांगितले? त्याच्या या वक्तव्यावरून लिबरल टोळी मात्र चांगलीच निराश झाल्याचे दिसून येत आहे.
हा व्हिडियो समोर येताच लिबरल मुस्लीम याला 'फसवणूक' म्हणत आहेत. तर, काहींनी, 'तुला बोलायच्या आधी लाज वाटायला हवी.' असे म्हणून त्याच्या या वक्तव्यांवर टीका केल्या गेल्या आहेत. दिल्ली दंगलीप्रकरणी जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद सध्या तुरुंगात आहे. उमर खालिदच्या अटकेनंतर त्याच्या समर्थनार्थ अनेकांनी आवाज उठवला.
मात्र, त्यावेळी या सगळ्यात कन्हैया कुमारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले जात होते. उमर खालिद हा कन्हैया कुमारसोबत एक नाही तर अनेक प्रसंगी राहिला आहे. दोघांची छायाचित्रे पाहून याचा सहज अंदाज लावता येतो. आता परिस्थिती अशी आहे की, राजकारणामुळे कन्हैयाने उमर खालिदपासून पूर्णपणे अंतर ठेवण्याचा निश्चय केला असावा.