पाकिस्तानी बोटीतून ४०० कोटींचे ७७ किलो हेराॅईन जप्त; गुजरात एटीएसची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2021
Total Views |
gujrat _1  H x



अहमदाबाद -
गुजरात एटीएसने सोमवारी (२० डिसेंबर २०२१) ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली. यावेळी पाकिस्तानच्या मासेमारी बोटीतून सहा जणांनाही अटक करण्यात आली आहे.

गुजरातच्या संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएससोबत केलेल्या संयुक्त कारवाईत 'अल हुसैनी' नावाची पाकिस्तानी मासेमारी नौका भारतीय जलक्षेत्रात अडवली. ज्यामध्ये सहा क्रू सदस्य होते. या बोटीतून सुमारे ४०० कोटी रुपयांचे ७७ किलो हेरॉईनही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.


या वर्षाच्या सुरुवातीला, कोस्ट गार्ड आणि एटीएसने अशीच एक कारवाई केली आणि कच्छच्या जाखाऊ किनार्‍याजवळ भारतीय पाण्यातून आठ पाकिस्तानी नागरिकांना सुमारे १५० कोटी रुपयांचे ३० किलो हेरॉईन घेऊन जाणाऱ्या बोटीतून पकडले. गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची खेप जप्त केली होती. वृत्तानुसार, या फेरीतून हेरॉईनची मोठी खेप भारतात पोहोचवली जाणार होती.


कच्छमधील मुंद्रा बंदरातील अधिकार्‍यांनी यापूर्वी सांगितले होते की, यावर्षी सप्टेंबरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) भारतातील हेरॉईनच्या सर्वात मोठ्या खेपाचा पर्दाफाश केला होता. अफगाणिस्तानातून आलेल्या कंटेनरमधून सुमारे तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@